21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबाद  तुळजापुरात ‘स्वराज्य‘ संघटनेच्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण

  तुळजापुरात ‘स्वराज्य‘ संघटनेच्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : राज्यसभेचे माजी खासदार, संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे यांच्या उपस्थितीत स्वराज्य संघटनेच्या लोगोचे अनावरण केले. तुळजापुरात आयोजित सभेत संभाजीराजेनी स्वराज्य संघटनेची अधिकृत सुरुवात करताना सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा पाया रचला आहे. यावेळी त्यांनी बोलताना स्वराज्य संघटना राजकारणात जाणार नाही, मात्र वेळप्रसंगी आम्हाला तो मार्ग मोकळा असल्याचे सांगत स्पष्ट संकेत दिले आहेत.

दरम्यान, संभाजीराजे यांनी या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील प्रत्येक दुर्गुम भागात जाणार असल्याचे ते म्हणाले. सर्वसामान्य लोकांना ताकद देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज तुळजापूरात आई भवानीच्या मंदिरासमोरून स्वराज्य संघटनेची सुरुवात होत आहे. आमच्याकडे लोकांसारखा पैसा नाही. काही जण म्हणतील की हे मधूनच कुठून आले? केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे वंशज आहे म्हणून हे करत आहेत. मात्र, मी माझा राजवाडा २० वर्षांपासून सोडून दिला आहे. माझं वैभव सोडून दिलं आहे. महिन्यात पाच दिवसांपेक्षा जास्त मी तिथे राहत नाही.

संभाजीराजे यांनी यावेळी मराठा आरक्षणावरही भाष्य केले. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मी लोकांना समजावले होते. त्यानंतर शासनाला पर्याय सुचवले होते. देवेंद्र फडणवीस यांनाही टिकणारे आरक्षण द्या म्हणून सांगितले होते. आताचे मुख्यमंत्री पॉसिटिव्ह आहेत, त्यांनी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या