मुंबई : धीरेंद्र शास्त्री यांचा मीरा रोड येथे कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. ते महाराष्ट्रात येतात व व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्याबद्दल अपमान करनारे विधाने करतात. पण महाराष्ट्र सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संताचा अपमान करणा-यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवु देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी दिला.
सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भितीनेच मंत्रालयात लगबग सुरू
राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने आपला न्याय राखुन ठेवला आहे. अशाच काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. नाना टटोले यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधताना म्हटले आहे की, न्यायालय काय न्याय देईल यावर बोलने योग्य नाही परंतू मंत्रालयात लगबग सुरू झाली असल्याची माहीती मिळत आहे, त्यांमुळे सत्ताधा-यांना काहीतरी चाहुल लागली आहे असे वाटते, असे ते म्हणाले. सरकार चि कालावधी संपल्यानंतरकिंवा सरकार पडण्याची वेळ आल्यानंतर अशीच वेळ येते असा त्यांनी टोला त्यांनी लगावला.