22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रआंतरधर्मीय विवाह प्रकरण : अमरावतीमधील युवती अखेर सापडली; सातारा पोलिसांनी घेतले ताब्यात

आंतरधर्मीय विवाह प्रकरण : अमरावतीमधील युवती अखेर सापडली; सातारा पोलिसांनी घेतले ताब्यात

एकमत ऑनलाईन

अमरावती : अमरावतीमध्ये आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर काल खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. काल पोलिस ठाण्यात हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले होते. खासदार नवनीत राणा यांनी ज्या मुलीला शोधण्यासंदर्भात काल पोलिसांना अल्टिमेटम दिले होते ती मुलगी अखेर सापडली आहे.

बुधवारीच तिचा शोध लागला असून ती साता-यात सापडली. तिला आज गुरुवारी अमरावती पोलिस घरी आणणार आहेत. काल ज्या पोलिसांसोबत खासदार नवनीत राणा यांनी खडाजंगी केली. त्याच पोलीस अधिका-यांचे भाजपने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

सातारा पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेतले
यावेळी अमरावती पोलिस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी माहिती दिली की, ही युवती एकटी रेल्वेने प्रवास करत होती. आम्ही पुणे रेल्वे पोलिस आणि सातारा पोलिसांशी लोकेशन शेअर केलं आणि अखेर सातारा पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेतले. अमरावती पोलीस साता-यासाठी रवाना झाली असून ती आज (८ सप्टेंबर) अमरावतीत दाखल होईल अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी काल दिली.

लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कांदे बटाटे विक्री करणा-या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भाजप, बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळं मुलगी सापडली- खासदार बोंडे
खासदार अनिल बोंडे म्हणाले की, धारणी अकोटमधून दोन महिन्याआधी पळवून नेलेल्या मुलीचा फोन आला. तिला मारहाण होत होती. ती मुलगी आज धारणीत येत आहे. परवाच्या दिवशी पळवून नेलेली ती मुलगी साता-यात सापडली आहे. हे यश भाजप, बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळे मिळाले आहे.

दुर्दैवाने पोलिसांची भूमिका ही बोटचेपी होती. आता पोलिसांनी भूमिका घ्यावी. या मुलींचे संरक्षण झाले पाहिजे. या मुलींचे आणि त्यांच्या परिवाराचे समुपदेशन झाले पाहिजे, असेही खासदार बोडे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या