32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहे. नागरी उड्डयन संचालनालयाने या निर्णयासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. केंद्र सरकारने देशातील परिस्थितीचा आढावा घेऊन अनलॉक ४ मध्येही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर संचालनालयाने हे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. भारतात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या व दुस-या क्रमांकावर असलेल्या अमेरिका व ब्राझीलपेक्षा जास्त रुग्ण दररोज आढळून येत आहेत. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण जगात आतापर्यंत भारतातच आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्राने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

यातून विशेष विमान सेवांना वगळण्यात आलेले आहे. नागरी उड्डयन संचालनालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे परिपत्रकाद्वारे म्हटले आहे. याचबरोबर सक्षम प्राधिकरणाद्वारे ठरवण्यात आलेल्या मार्गांवर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीला परवानगी दिली जाऊ शकते, असेही म्हटले आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळावा : खा. जाधव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या