मालेगाव शहरात ‘त्या’ नागरिकांची चौकशी सुरू

    342

    मालेगाव : प्रतिनिधी
    मुंबई पुण्यावरून आलेल्या नागरिकांचा मालेगावात मुक्त संचार या मथळ्याखाली बुधवारी दैनिक एकमतमध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या प्रशासकीय अधिकारी व सरपंच यांनी घरोघरी जाऊन त्या नागरिकांची चौकशी सुरू केली आहे.

    Read More  जिंतूर तालुक्यातील सायखेडात भावानेच केला भावाचा निर्घृण खून

    कामानिमित्त पुणे,मुंबई या मोठया शहरात गेलेले शेकडो नागरिक मुळगावी मालेगावात दाखल झाले आहेत़ मात्र प्रशासनाकडून कोणतीही तपासणी अथवा चोैकशी न झाल्याने ते मुक्तपणे फिरत होते़याबाबत बुधवारी दैनिक एकमतमध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या गट विकास अधिकारी मीना रावताळे,ग्रामसेवक देशमुख, तलाठी पाटील, सरपंचा उज्वला इंगोले यांनी सकाळीच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, पोलीस यांच्या मदतीने जांगमवडी, इंदिरानगर भागातील घरोघरी जाऊन पुणे, मुंबई येथून आलेल्या लोकांना वैद्यकीय तपासणी करण्याचे आव्हान केले तसेच त्यांना घरीच विलागीकरण कक्षात रहावे, विनाकारण बाजारात खरेदीसाठी फिरु नये अथवा घराबाहेर पडू नये अशा सूचना दिल्या आहेत़ प्रशासनाकडून या नागरिकांची चौकशी सुरु झाल्याने भीतीखाली असलेल्या स्थानिक नागरिकांचा जीव भांडात पडला आहे.