22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारताकडून पाकिस्तान, चीनला दिल्लीत बैठकीचे आमंत्रण

भारताकडून पाकिस्तान, चीनला दिल्लीत बैठकीचे आमंत्रण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तान आणि चीनला दिल्लीतील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी आमंत्रण दिले असून, ही बैठक अफगाणिस्तानच्या मुद्यावर होणार आहे. यासाठी भारताने चीन, पाकिस्तानसह रशियालाही आमंत्रण दिले आहे. या बैठकीत या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी भारताने १० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर अशा २ तारखा सुचवल्या आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर तणाव असतानाही दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांवर होणा-या या बैठकीचे निमंत्रण पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांना देण्यात आले आहे. यामागे अफगाणिस्तानवरील तालिबानची सत्ता आणि त्यामुळे तयार झालेले मानवहक्क उल्लंघन आणि सरक्षाविषयक प्रश्न यावर उत्तर शोधणे असे उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

रशियातही महत्त्वाची बैठक
दुसरीकडे भारत रशियाने मॉस्कोमध्ये अफगाणिस्तानच्याच मुद्यांवर आयोजित केलेल्या बैठकीलाही हजेरी लावणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. ही बैठक २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि तालिबानची पहिली चर्चा ३१ ऑगस्ट रोजी दोहा येथे झाली. तेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन झालेले नव्हते. आता तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन केल्यानंतर भारत आणि तालिबान सरकार पहिल्यांदाच रशियात चर्चा करणार आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या