27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Home‘आयओए’ने केली २०० कोटींची मागणी

‘आयओए’ने केली २०० कोटींची मागणी

एकमत ऑनलाईन

क्रीडा संघटनांना मोठी आर्थिक अडचण

नवी दिल्ली : करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी २०० कोटींपेक्षा अधिक एकरकमी अनुदान द्या, अशी मागणी भारतीय आॅलिम्पिक संघटनेकडून (आयओए) क्रीडा मंत्रालयाला करण्यात आली आहे. ‘आयओए’चे अध्यक्ष नंिरदर बात्रा यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना पाठवलेल्या पत्रात ही मागणी केली आहे.

Read More  शहराचे विकेंद्रीकरण; दुर्गम भागांचा विकास करण्याची संधी

किमान वर्षभर तरी क्रीडा स्पर्धाकडे प्रायोजक पाठ फिरवतील त्यामुळे ही मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘‘आयओएसाठी १० कोटी अनुदान द्यावे. आॅलिम्पिक क्रीडा प्रकारांच्या राष्ट्रीय महासंघांसाठी प्रत्येकी पाच कोटी, आॅलिम्पिक वगळता अन्य खेळांतील क्रीडा संघटनांसाठी अडीच कोटी आणि राज्य आॅलिम्पिक संघटनांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये अनुदानाची मागणी आहे. करोनामुळे या सर्व क्रीडा संघटनांना मोठी आर्थिक अडचण आहे.

जर क्रीडा स्पर्धाच्या सरावाला सुरुवात करायची असेल तर या आर्थिक मदतीची गरज आहे. करोनामुळे जग आर्थिक संकटात असताना प्रायोजकही क्रीडा क्षेत्राकडे पाठ फिरवतील,’’ असे बात्रा यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या