27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeआयपीएल तर पैसा कमवायचा धंदा : बॉर्डर

आयपीएल तर पैसा कमवायचा धंदा : बॉर्डर

एकमत ऑनलाईन

स्थानिक स्पर्धेपेक्षा जागतिक स्पर्धांना महत्त्व दिले पाहिजे

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांंनी आयपीएल आणि टी-२० विश्वचषकावर मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, आयपीएल केवळ पैसा कमावण्याचा व्यवसाय आहे. तसेच यावर्षी होणा-या टी-२० विश्वचषकाऐवजी आयपीएलला प्राधान्य देण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन आॅक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान करण्याची शक्यता आहे.

बॉर्डर यांनी म्हटले की, मी या विचाराशी खुश नाही. स्थानिक स्पर्धेपेक्षा जागतिक स्पर्धांना महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे जर टी-२० विश्वचषकाचे आयोजन झाले नाही, तर मला वाटत नाही की आयपीएलचे आयोजन होऊ शकते. मी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. तसेच ‘हा केवळ पैसा कमावण्याचा व्यवसाय आहे. हे बरोबर नाही का?’ असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, ‘टी-२० विश्वचषकाला निश्चितपणे प्राधान्य दिले पाहिजे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाला आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यापासून रोखले पाहिजे.’

Read More  सुरतमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

असे असले तरीही, आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलमधील फ्रेंचायझी संघांनी सर्वाधिक १५.५० कोटी रुपयांना विकत घेतलेला परदेशी खेळाडू आहे. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड वॉर्नरनेदेखील आपल्या फ्रेंचायझींबरोबर आकर्षक करार केले आहेत.

बॉर्डर यांना माहीत आहे की, जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा खूप दबदबा आहे. कारण आयसीसीच्या उत्पन्नात त्यांचे सर्वाधिक योगदान आहे. परंतु त्यांनी म्हटले की, ‘जर आयपीएलला टी-२० विश्वचषकाऐवजी प्राधान्य दिले तर ते चुकीच्या वाटेने जात आहेत.’

‘यामुळे सर्व दरवाजे बंद होतील. तुम्हाला माहीत आहे की, भारत आयपीएलचे आयोजन करत आहे. ते याच्या खूप जवळ आहेत. परंतु जर तुम्ही जागतिक क्रिकेट उत्पन्नाच्या ८० टक्के भाग असाल तर जे काही होईल त्यामध्ये तुमचेच ऐकले जाईल, हे मला माहिती आहे,’ असेही ते यावेळी म्हणाले. हे चुकीच्या मार्गाने जाण्यासारखे होईल,’ असेही भारताबद्दल बोलताना बॉर्डर यावेळी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या