24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलॉकडाऊनदरम्यान होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का?-मनसे

लॉकडाऊनदरम्यान होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का?-मनसे

एकमत ऑनलाईन

‘लॉकडाऊन नियमावलीत होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का? मनसे नेते अखिल चित्रे

मुंबई : अवघ्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्याबद्दल उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं एक होर्डिंग शिवसेना नगरसेवकाने मातोश्री जवळील कलानगर परिसरात लावण्यात आलं आहे. या बॅनरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतला आहे. ‘लॉकडाऊन नियमावलीत होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का,’ असा प्रश्न मनसे नेते अखिल चित्रे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 18 मे रोजी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडला. यानंतर शिवसेना नगरसेवक आणि सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी वांद्रे पूर्वेकडील कलानगर जंक्शन परिसरात उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं मोठं होर्डिंग लावलं आहे.

Read More  आता कोरोनाचा ग्रामीण भागात प्रसार

या होर्डिंगवर ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!’ असे लिहिण्यात आले आहे. लॉकडाऊनदरम्यान शिवसेना नगरसेवकाने लावलेल्या या होर्डिंगबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.या होर्डिंगवरुन मनसे नेते अखिल चित्र यांनी आक्षेप घेतला आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 31 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनच्या या काळात होर्डिंगबाजी करायला नियमावलीत परवानगी आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान सदा परब प्रतिनिधीत्व करत असलेल्या एच पूर्व भागात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिल चित्रे यांनी एच पूर्व भागात नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या