27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का?

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का?

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले नाही. देशातील लोकशाही सोयीनुसार न्याय देणारी नाही. आम्हाला न्याय मिळाला नाही. सत्तेतून फुटलेला एखादा गट मूळ शिवसेना कसा असू शकतो, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बंडखोर नेते खरंच शिवसेनेचे आमदार राहिले आहेत का? त्यांनी स्वत:ला हा प्रश्न विचारा, असंही त्यांनी खडासावलं आहे. मध्यावती निवडणुका महाराष्ट्रात होऊ शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार राऊत आज दिल्लीत बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर राऊत यांनी सवाल उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही निवडणूक घटनाबा कशी काय केली जाऊ शकते. देशाच्या जनतेला यातून काय मिळणार आहे?, असंही त्यांनी विचारंल आहे. मुळ सत्तेतून फुटलेला गट शिवसेना कशी काय असून शकते हे बंडखोरांनी सांगावे, असंही त्यांनी विचारलं आहे.

राऊत म्हणाले, देशाचं राजकारण रक्तरंजित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धार्मिक तेढ निर्माण करुन राजकारण केलं जातं आहे. सुरुवातीला शिवसेनेला डावललं गेल आताही तो प्रयत्न होत आहे. यावरुन कळतं की, मुंबईतून सेनेला वेगळ करायचं आहे. पुढे मध्यावती निवडणुकांबाबत पवारांनी केलेल्या वक्तव्याचा पाठवपुरावा करत राऊत म्हणाले, गुजरातसोबतच महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ शकतात. त्यामुळं पवारांच्या भाकिताप्रमाणे मध्यावती निवडणुका होऊ शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

लोक सोडून गेल्यानं सेना कमकुवत होत नाही. सेना कागदावर कमकुवत आणि जमिनीवर मजबूत आहे, असंही त्यांनी खडासावलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे. ती खरी खोटी असा प्रश्न येत नाही. त्यामुळे जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना हे सुत्र आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, सेनेच्या स्थापनेपासून २८० सेना स्थापन झाल्या आहेत. पण त्यातील दोनच सेना टिकल्या. एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना. त्यामुळं भारतीय राजकारणात या दोन्ही सेना कायम राहतील, अशी स्पष्टोक्ती ही राऊतांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या