22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयभारताविरुध्द आयएसआयचे मोठे षडयंत्र

भारताविरुध्द आयएसआयचे मोठे षडयंत्र

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी स्पेशल सेलने दिल्ली आणि इतर राज्यांतून दहशतवाद्यांच्या मोठ्या मॉड्यूलला अटक केली. या दहशतवाद्यांनी चौकशीदरम्यान पाकिस्तान आणि आयएसआयच्या प्लान बद्दल मोठे खुलासे केले होते. मात्र आता पहिल्यांदाच आयएसआयच्या नवा प्लानचा खुलासा झाला आहे. आयएसआयच्या नव्या प्लानबद्दल गुप्तचर यंत्रणांनी अलर्टद्वारे शेअर केले आहे.

आयएसआय आणि अंडरवर्ल्डच्या टेरर मॉड्यूलचा मास्टर प्लॅन आहे. ज्यामध्ये आयएसआय एअरलाईन थांबवण्यासाठी सायबर हल्ल्याचा कट रचत असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय पावर ग्रीडसह हिंदू नेत्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत अलर्ट जारी केला आहे.

हे आहे आयएसआयचे ५ षडयंत्र
आयएसआय भारतातील विमानसेवेला लक्ष्य करण्यासाठी सायबर हल्ल्याचा प्लान आखत आहे. एटीसी रूममध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीला पेन ड्राइव्हमध्ये असे सॉफ्टवेअर दिले जाईल, जेव्हा तो ते सॉफ्टवेअर पेन ड्राईव्हमधून सिस्टममध्ये टाकेल. त्यानंतर एटीसी काम करणे थांबवेल आणि संपूर्ण यंत्रणा विस्कळीत होईल. यामुळे, मोठ्या प्रमाणावर विमान क्रॅश होण्याची शक्यता आहे.
– आयएसआय आपल्या कटात आरएसएस शाखांवर, हिंदू धार्मिक स्थळांवर आणि सार्वजनिक सभांवर हल्ल्यांचा प्लान आखत आहे.
– पाटणामध्ये महात्मा गांधी सेतू, पूल, रेल्वे ट्रॅक इत्यादी दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. जेणेकरून कनेक्टिव्हिटी थांबवता येईल.
– आयएसआय पॉवर ग्रीड अयशस्वी करण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे देशात वीज संकट आणि ब्लॅकआउट होईल.
– आयएसआयच्या निशाण्यावर मोठे नेते आहे. याशिवाय इस्लामच्या विरोधात बोलणारेही आयएसआयच्या हिटलिस्टवर आहेत.

दहशतवादविरोधी पथकातील अधिकारी काश्मीर खो-यात रवाना
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी शाळेत घुसून केलेल्या हत्यांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. निर्दोष, निष्पाप आणि अल्पसंख्यांकांची हत्या करणा-यांना त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची स्थानिक मॉड्यूल मोडून काढण्यासाठी केंद्राने दहशतवादाविरुद्ध लढण्यात पारंगत असलेल्या अधिका-यांना खो-यात पाठवले आहे.

सीटी टीम काश्मिरात दाखल
दहशतवाद विरोधी लढ्यात पारंगत असलेले इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन देका काश्मीर खो-यात जाणार आहेत. स्वत: ते लक्ष घालणार आहेत. अन्य सुरक्षा यंत्रणांच्या सीटी टीम्स आधीच काश्मीरमध्ये दाखल झाल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असताना हे दहशतवादी हल्ले सुरु झाले आहेत. काश्मीर खो-यातील सर्व हॉटेल्समध्ये १०० टक्के बुकिंग झाले आहे. आर्थिक घडामोडींना वेग येत असताना असे हल्ले होत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या