22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही

इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही

एकमत ऑनलाईन

ढाका : बांगला देशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि अज्ञात धर्मांधांनी केलेली तोडफोड या घटनांमुळे भारतातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेमध्ये ४ जण ठार झाले असून, अनेक जखमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये धार्मिक कट्टरतावाद वाढू लागल्याची टीका होऊ लगली आहे. या पार्श्वभूमीवर आता बांगलादेशचे माहिती व प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. विशेषत: धार्मिक कट्टरतेवर तीव्र आक्षेप घेतानाच इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही, अशी देखील भूमिका त्यांनी स्पष्ट केले आहे. देशाने पुन्हा एकता १९७२ च्या राज्यघटनेनुसार राज्यकारभार करण्यची गरज देखील त्यांनी व्यक्त केली.

दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत बोलताना मुराद हसन म्हणाले, बांगला देश धार्मिक कट्टरतावाद्यांसाठी खुलं मैदान होऊ शकत नाही. आपल्यामध्ये देशासाठी लढा दिलेल्या स्वातंत्र्ययोद्ध्यांचे रक्त आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पुन्हा १९७२ च्या राज्यघटनेकडे परत जावे लागणार आहे. यासंदर्भात मी संसदेत देखील बोलणार आहे. यावर कुणीही बोलले नाही, तरी मी त्यावर बोलेन अशी ठाम भूमिका मुराद हसन यांनी मांडली आहे.

१९७२ ची राज्यघटना पुन्हा लागू होणार?
बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबुर रेहमान यांच्या काळात तयार करण्यात आलेली १९७२ ची राज्यघटना देशात पुन्हा लागू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मला वाटत नाही की इस्लाम हा आपला राष्ट्रीय धर्म आहे. आपण १९७२ च्या राज्यघटनेकडे पुन्हा जाऊ. पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली आपण त्यासंदर्भातलं विधेयक संसदेत मंजूर करून घेऊ, असे मुराद हसन म्हणाले.

धर्मनिरपेक्ष बांगलादेश
दरम्यान, बांगलादेश धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचा दावा यावेळी मुराद हसन यांनी केला. बांगलादेश हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. इथे प्रत्येकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या