23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयइस्रोने पीएसएलव्ही-सी५३/डीएस-ईओचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोने पीएसएलव्ही-सी५३/डीएस-ईओचे यशस्वी प्रक्षेपण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवार दि. ३० जून रोजी सायंकाळी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी५३/डीएस-ईओ मिशनचे यशस्वी प्रक्षेपण केले.

हे प्रक्षेपण दुस-या लॉन्च पॅडवरून करण्यात आले. या मिशनचे काउंटडाऊन २४ तासांपूर्वी २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू झाले होते. न्यूस्पेस इंडिया लिमिटेडचे हे दुसरे व्यावसायिक प्रक्षेपण आहे. यापूर्वी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(इस्रो) पीएसएलव्ही-सी५३/डीएस-ईओ४ मिशन श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले होते. दुस-या लाँच पॅडवरून पीएसएलव्ही रॉकेटचे हे १६ वे उड्डाण होते. बेंगळुरू स्थित दिगंतारा रोबस्ट इंजिनिअरिंग प्रोटॉन फ्लूरोसेन्स मीटर प्रोटॉन डोसीमिर पेलोड आणि ध्रुव स्पेस सॅटेलाइट ऑर्बिटल डिप्लॉयर या रॉकेटसह पाठविण्यात आले आहेत. दोघेही स्टार्टअप कंपन्यांचे उपग्रह आहेत. दोघांशिवाय ४४.४ मीटर उंचीच्या रॉकेटमध्ये आणखी तीन उपग्रह असतील. हे रॉकेट पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या ५७० किमी वरच्या कक्षेत उपग्रहांना तैनात करेल.

जे तीन मुख्य उपग्रह पाठवले आहेत, त्यापैकी डीएस-ईओ उपग्रह आणि एनईयू सार हे दोन्ही उपग्रह सिंगापूरचे आहेत. हा सिंगापूरचा पहिला व्यावसायिक उपग्रह आहे. हे उपग्रह कोणत्याही हवामानात रात्रंदिवस फोटो काढण्यास सक्षम आहे. डीएस-ईओ उपग्रहाचे वजन ३६५ किलो आहे. तर एनईयू सार हा उपग्रह १५५ किलोंचा आहे. तिस-या उपग्रहाचे नाव स्कूब-१ आहे. हा उपग्रह सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने बनवला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या