22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांवर अशी वेळ आली तर अवघडय; गर्दी’ जमवण्यावरुन अजित पवारांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ आली तर अवघडय; गर्दी’ जमवण्यावरुन अजित पवारांचा हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौ-यात सरकारी कर्मचा-यांना परिपत्रक काढून बोलावण्यात आल्यावरुन त्यांनी टीका केली. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून सर्व अंगणवाडी सेविका, परिवेक्षिका यांना खुशाल बैठकीसाठी बोलावले आहे.

असे राज्यांत कधी झाले नव्हते. परिपत्रक काढून त्यांना बोलावण्यात आले आहे. आता आठवड्याच्या पहिल्या दिवशी या महिला सभेला आल्या तर मग लहान मुलांचे काय? त्यांना कोण सांभाळणार? आता मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ आली असेल तर अवघड आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार म्हणाले की, राज्यातील जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री नेमले नाहीत. सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत की नवीन पालकमंत्री आल्यानंतर डीपीडीसी बाबत निर्णय घेतील. आता जर निधी खर्च झाला नाही तर पैसे लॅप्स होतील. कदाचित त्यांची अडचण असेल की एका जिल्ह्यात दोन तीन इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला संधी द्यायची हा प्रश्न असेल, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी म्हटलं की, पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशनात अध्यक्षांनी आगामी रणनितीबाबत माहिती दिली. मी काल बोलणं टाळले. माध्यमांनी काल चुकीचा अर्थ काढला. मी एकटाच नाही तर सुनील तटकरे, वंदना चव्हाण, वेळेअभावी बोलू शकले नाहीत. मी मराठी माध्यमांना कालच नेमके काय झाले याबाबत माहिती दिली. मी वॉशरूमला सुद्धा जायचे नाही का? असा सवाल त्यांनी केला. मी केंद्रात मार्गदर्शन करत नाही राज्यांत मी बोलत असतो. त्यामुळे गैरसमज दूर करावा, असे अजित पवार म्हणाले.

लम्पी आजार वाढतोय, सरकारने उपाययोजना करावी
अजित पवार म्हणाले की, देशपातळीवर पंजाब, हरियाणा, राजस्थान लम्पी स्किन आजार मोठया प्रमाणात वाढत आहे. यामुळे शेतक-यांचा दुग्ध व्यवसायाला अडचण निर्माण झाली आहे. जर वेळीच लसीकरण नाही झाले तर मात्र आजार वाढतो. मी पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी याबाबात बोललो आहे. या आजाराबाबत समज गैरसमज आहेत. याबाबत सरकारने जनजागृती करावी.

म्हशीला हा आजार होत नाही. राज्य सरकारने याबाबत तत्काळ पाऊले उचलावीत. जर जनावरं दगावली तर मोठा परिणाम शेतक-यांवर होईल, असंही अजित पवार म्हणाले. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे. त्या खात्याच्या मंर्त्यांनी प्रेस घेऊन मार्गदर्शन करावं. संकरित गाईमध्ये याचं प्रमाण जास्त आहे, असं ते म्हणाले. १६ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाने कधी सुरु करायचे याबाबत बैठक आहे. १ ऑक्टोबरला कदाचित कारखाने सुरू होतील. यावेळी अनेक जनावरे येतील परिणामी आजार वाढेल, असंही अजित पवार म्हणाले.परदेशातून लशी मागवा. जनावरांना आजार होणारे नाही याची काळजी सरकारने घ्यावी, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, शिंदे- ठाकरे गटात सातत्यानं वाद होत आहेत. कोणीही आमदार उठतो आणि बंदूक काढतो. बिहार, उत्तरप्रदेश आहे का हे? गृहमत्री, मुख्यमंत्री काय करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते असे करत असतील तर अवघड आहे. राज्यातील परिस्थिती चिघळत ठेवणं हे राज्याला परवडणारे नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या