नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि शेतकरी नेते राकेश टिकैत बुधवारी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या घरी पोहोचले आहेत. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. सरकारच्या निमंत्रणावरून प्रशिक्षक आणि माजी कुस्तीपटू महावीर फोगट यांनी सरकार खडबडून जागे झाले हे चांगले आहे, असे म्हटले आहे.
महावीर फोगट म्हणाले, इतक्या दिवसांनी सरकारला जाग आली आहे. अनुराग ठाकूर यांनी पैलवानांना बोलावले आहे. यावर आता तोडगा काढला पाहिजे, असे मला म्हणायचे आहे, असे ते म्हणाले. महावीर फोगट हे कुस्तीपटू विनेश फोगटचे काका आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कुस्तीपटू सर्वांशी बोलून पुढील निर्णय घेणार आहेत.