22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeरेड झोनमधील विमानसेवा सध्या सुरु करणे अशक्य - अनिल देशमुख

रेड झोनमधील विमानसेवा सध्या सुरु करणे अशक्य – अनिल देशमुख

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशांतर्गत विमान वाहतूक 25 मे पासून नियंत्रित पद्धतीने सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. असे असले तरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. मध्यरात्री ट्वीट करत त्यांनी विमानसेवा सुरु करणे धोक्याचे असल्याचे म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read More  लातूर जिल्ह्यातील ९१ पैकी ८४ निगेटिव्ह, ४ पॉझिटिव्ह

ग्रीन झोनमधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच, असं देखील अनिल देशमुखांनी म्हटलं आहे.

देशांतर्गत विमान वाहतूक उद्या म्हणजेच 25 मे पासून नियंत्रित पद्धतीने सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ऑगस्ट महिन्याच्या आधी सुरु करण्याचा प्रयत्न करू असं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या