17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeबीडनिवडून द्यायचे हे जनतेच्या हातात

निवडून द्यायचे हे जनतेच्या हातात

एकमत ऑनलाईन

बीड : निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे हे जनता ठरवते, नेत्याचे भविष्य जनतेच्या हातात असते, असे वक्तव्य करत धनंजय मुंडे यांनी कालच्या दस-या मेळव्यात पंकजा मुंडे यांनी निवडणुकीसंदर्भात केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान भगवान भक्तीगड सावरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी मी आता २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे वक्तव्य केले होते. मी आता कोणतीही अपेक्षा करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना मुंडे म्हणाले, निवडणूक लढवणे हा लोकशाहीचा एक भाग आहे, ती लढवलीच पाहिजे. पक्ष जर संधी देत असेल तर कुठून निवडणूक लढायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे हे जनता ठरवत असते. माहूर गडावर रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी धनंजय मुंडे आले होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. लोकशाहीमध्ये प्रत्येकजण निवडणुकीची तयारी करत असतो, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले आहे. निवडणूक हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यामुळे कोणी कोठून निवडणूक लढावी किंवा निवडणूक लढावी की नाही हे ज्याचा त्याचा पक्ष ठरवेल. शेवटी निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे हे जनता ठरवत असते, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या होत्या
मी थकणार नाही, थांबणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही. मी कोणावरही नाराज नाही. मी का नाराज होऊ. छत्रपती संभाजीराजांचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळे मी संघर्ष करत राहणार असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी आता कोणतीही अपेक्षा करणार नाही. मी आता २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या होत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या