25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय पोस्ट खात्यात ५०० रुपये ठेवणे बंधनकारक

पोस्ट खात्यात ५०० रुपये ठेवणे बंधनकारक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जर आपण पोस्ट ऑफिसमध्ये खातेदार असाल तर पोस्ट ऑफिस खात्यात ११ डिसेंबरपर्यंत किमान शुल्क ठेवणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिस खात्यात किमान ५०० रुपये ठेवणे बंधनकारक आहे. इंडिया पोस्टने आपल्या ग्राहकांना याविषयी आधीच माहिती दिली आहे. या माहितीनुसार पोस्ट ऑफिस खातेधारकांच्या खात्यात किमान ५०० रुपये ठेवण्यासाठी १२ दिवस आहेत.

आपल्या बचत खात्याच्या ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये इंडिया पोस्टने म्हटले आहे की, पोस्ट ऑफिस बचत खात्यात आता किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. जर आपणास मेंटेनेंस चार्ज भरायचे नसेल तर ते ११ डिसेंबर २०२० पूर्वी आपल्या खात्यात ५०० रुपये निश्चितच ठेवा.

काय आहेत नियम?
इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात किमान ५०० रुपये न ठेवल्यास मेंटेनेंस चार्ज म्हणून १०० रुपये वजा केला जाईल. जर आपल्या खात्यात शिल्लक नसेल तर ते आपोआप बंद होईल. पोस्ट ऑफिस बचत खाते कोणत्याही प्रौढ व्यक्तीद्वारे वैयक्तिकरित्या किंवा जॉईंट स्वरूपात उघडता येते. अल्पवयीन मुलांसाठी त्यांचे पालक देखील त्यांच्या नावावर खाते उघडू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या नावे केवळ एक पोस्ट ऑफिस सेव्हिंग खाते उघडता येते. हे खाते उघडताना नॉमिनेशन अनिवार्य आहे.

बचत खात्यावर व्याज दर ४ टक्के
सध्या वैयक्तिक आणि जॉईंट पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ४ टक्के दराने व्याज मिळते. या खात्यावर मिळणा-या व्याजाची गणना १० तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या किमान शिल्लक आधारे केली जाते. पोस्ट ऑफिस वेबसाइटनुसार या कालावधीत जर खात्यात शिल्लक ५०० रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

युध्दासाठी सज्ज व्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या