22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रमोदी यांच्या हूकूमशाही तंत्रापासून देश वाचविणे गरजेचे

मोदी यांच्या हूकूमशाही तंत्रापासून देश वाचविणे गरजेचे

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही तंत्रापासून देश वाचविण्याची आजच्या घडीची गरज लक्षात घेत काँग्रेस पक्षाने अंतर्गत प्रश्न त्वरित सोडवावेत. गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चिंतन करावे अन कारभार सुधारावा,’’ अशी अपेक्षा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘‘आम्ही २३ जणांनी पक्षाध्यक्षाच्या निवडणुकीबाबत ठोस कारवाई करा अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते. पक्षनेतृत्वाला लिहिलेले हे पत्र फोडण्यात आले. पक्ष वाचविण्याच्या प्रयत्नांची दखल घेत सुधारणा करण्याऐवजी घरातल्या बाबी चव्हाट्यावर मांडल्या गेल्या. त्यानंतर नेमल्या गेलेल्या तीन समित्यांपैकी सर्वांत महत्त्वाच्या सुकाणू समितीचे आनंद शर्मा हे अध्यक्ष; पण त्यांचा अपमान केला गेला.

गुलाम नबी आझाद कित्येक वर्षे काँग्रेसचे शिपाई म्हणून वावरले. त्यांच्या भावनांची दखल घेतली गेली नाही. आता ते बाहेर पडले. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेण्याऐवजी ‘त्यांना सगळे मिळाले होते, मग त्यांनी पक्ष का सोडला,’ असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पक्षात निवडणुकीच्या मार्गानेच अध्यक्ष निवडला जावा असे सांगून ते म्हणाले, की राहुल गांधी किंवा त्यांची माणसे निवडून आली. अध्यक्ष पदाधिकारी झाले तरी हरकत नाही पण निवडून आलेल्या व्यक्तीलाच नैतिक अधिष्ठान असते हे विसरू नये. राहुल गांधी कोणत्या अधिकारात पक्षाबद्दलचे निर्णय घेतात? निवडणुकांमधील पराभवाचे चिंतन नाही, चुकांचे विश्लेषण नाही. हा काय प्रकार आहे? पक्षात हे का केले जात नाही, याची उत्तरे मिळायला हवीत

. उदयपूर येथे झालेल्या बैठकीत चुका का घडताहेत याचे चिंतन व्हायला हवे होते, पण त्याऐवजी ‘नवसंकल्प शिबिर’ असे नामकरण केले गेले. चुकले ते टाळण्यासाठी चर्चा आवश्यक असते पण चर्चा टाळण्याकडेच कल होता.

पंतप्रधानपदाचे उमेदवार शरद पवार
मोदींना थोपविण्यासाठी सर्व भाजपेतर पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, आजही काँग्रेसचा देशातील २० टक्के मतदार कायम आहे. तो वाढवता यायला हवा. प्रादेशिक पक्ष काँग्रेससारखे देशव्यापी नाहीत. पण आज पंतप्रधानपदाचा उमेदवार काँग्रेसकडे नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव समोर करून सर्वपक्षीय ऐक्य साधले गेले पाहिजे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या