28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रकोर्टाच्या प्रक्रियेबाबत भाष्य करणे चुकीचे

कोर्टाच्या प्रक्रियेबाबत भाष्य करणे चुकीचे

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोर्टाच्या प्रक्रियेबाबत भाष्य करणे चुकीचे असल्याचे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी गोगावलेंच्या विधानावर स्पष्टीकरण देत सावरासावर केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गट आणि शिवसेनाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. यावर आद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही.

मात्र, त्यापुर्वी सुप्रीम कोर्टातील संघर्ष पाच वर्षे चालेल तोवर धनुष्यबाण निशाणीवर आम्हीच निवडणून येऊ असा दावा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर आता केसरकरांनी सावरासावर करत कोर्टाच्या प्रक्रियेबाबत भाष्य करणं चुकीचं अस ल्याचे म्हणत हा वाद सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

केसरकर म्हणाले, सुप्रीम कोर्टमध्येकिंवा कोणत्याही कोर्टामध्ये ज्यावेळी एखाद्या प्रकरणावर सुनावणी सुरू असते. त्यावेळी आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिका-याने किंवा आमदाराने कोणत्याही प्रकारचे विधान करायचं नाही हे आधीच निश्चित झालेले आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचनादेखील दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अनावधानाने गोगावले यांनी विधान केले आहे.

ते ज्याप्रमाणे बोलले आहेत तशी कोणतीही भूमिका पक्षाची नाही तसेच याबाबत कोणतही स्टेटमेंट पक्षाकडून देण्यात आलेले नाही. तसेच कोर्टातील प्रकरणांवर निकाल येण्यासाठी वेळ लागतो असे कोणतीही म्हणण आमच्या पक्षाचे नसल्याचे केसरकरांनी स्पष्ट केले आहे. तसेच यापुढे न्यायालयाच्या कामकाजाबद्दल शिंदे गटातील पदाधिकारीकिंवा आमदार बोलणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या