26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रराणा दाम्पत्य काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले हे विसरू नये

राणा दाम्पत्य काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले हे विसरू नये

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईत आज नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम होते. त्यावरून, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी राणा दाम्पत्याव टिका केली. याच दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणा दाम्पत्यावर टिका केली. तर, शिवसैनिकांच्या संयमाचेही उदाहरण दिले. राणा दाम्पत्य हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत.

त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावरून मातोश्री बाहेर जोरदार राडा रंगला होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आणि शिवसैनिकांची आक्रमक भूमिका यामुळे राणा दाम्पत्याने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या दौरा असल्याने, या दौ-यास कुठलेही गालबोट लागू नये, म्हणून आपण आंदोलन मागे घेतल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.

तेव्हापासून शिवसेना प्रचंड मवाळ
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना आता प्रचंड मवाळ झाली आहे. कायम आक्रमक असणारा शिवसैनिक आता शांत, संयमी नबला आहे. मात्र, जर कोणी तुमच्या घरापर्यंत येत असेल तर काय, हा नवा पायंडा पडत आहेत. नेत्यांच्या घरावरच येऊन हल्लाबोल करायचा. माझ्या मते शिवसैनिकांनी प्रचंड संयम बाळगला आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. नवनीत राणा यांच्या हनुमान चालिसा पठण आंदोलनावरुन राणा यांच्यावर पाटील यांनी खोचक टिका केली. तर, शिवसेनेच्या भूमिकेचे एकप्रकारे स्वागतच केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या