22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रक्षमा करण्यासाठी मोठे मन लागते

क्षमा करण्यासाठी मोठे मन लागते

एकमत ऑनलाईन

मुंबई : कुणालातरी माफ करणे ही साधी गोष्ट नाही, त्यासाठी मोठे मन लागतं. साधत मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात. असा टोलाही शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लगावला आहे. सत्तासंघर्ष झाल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद टोकाला गेले आहेत.

दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात असे म्हटले आहे. भारतीय जैन महामंडळाचा विश्वमैत्री दिवस कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान, बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. फक्त घरात बसून काहीच होत नाही असा खोचक टोमणा मारत क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं, मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात. अस शिंदे यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले, कष्ट करा काहीही करा पण नशिबाची साथ नसेल तर काहीच होत नाही. पण कष्ट करण्याचे काम आपले आहे. ते तर करावेच लागेल. नाहीतर नशिबात सगळे आहे. मात्र, कष्ट नाही केले तर काहीच होणार नाही, नुसतं घरी बसून काहीच होत नाही. असा खोचक टोमणा त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना मारला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या