29 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांच्या निर्णयावर इतरांचा आक्षेप कशाला?

बाळासाहेबांच्या निर्णयावर इतरांचा आक्षेप कशाला?

एकमत ऑनलाईन

पुणे : बाळासाहेब ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख केले. आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून पुढे आणले. मग इतरांना आक्षेप कसला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. ते चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचारसभेत बोलत होते.

बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेनेत दोनदा बंड झाले. मात्र, त्याही निवडणुकीत बंडखोरी करणारे पडले. इजा बिजा झाली.आता तिजा दाखवायची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला.
अजित पवार म्हणाले की, आमचे सरकार आले. कामाला सुरुवात झाली. दुर्दैवाने तीन महिन्यांनी करोना आला. मित्रांनो महाराष्ट्राच्या कामाची दखल न्यायव्यवस्थेने घेतली. निर्णय घ्यायला बंदी होती.

मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून डॉक्टरची टीम, आरोग्य मंर्त्यांशी बोलत होतो. आढावा घेत होतो. जंबो हॉस्पिटल तयार केले. या सगळ्या काळामध्ये कुठेही आर्थिक बातमीत अडचणी येऊ दिल्या नाहीत.

अजित पवार म्हणाले की, आमचा कारभार व्यवस्थित सुरू होता. जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी गद्दारी केली. मात्र, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काढली. मराठी माणसांना आधार द्यायला, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून पक्ष काढला. शिवसेना कानाकोप-यापर्यंत पोचवली. त्यांच्याही काळात दोनदा बंड झाले. त्याही निवडणुकीत बंडखोर करणारे पडले. इजा बिजा झाली.आता तिजा दाखवायची वेळ आली आहे.

अजित पवार म्हणाले की, पक्ष सोडून जे गेले त्यांचा शिवसेना वाढवण्यात खारीचा तरी वाटा आहे का? शिवसेनाप्रमुखांनी तिकीट देऊन निवडून आणले. पाणपट्टीवाले, वढाप चालवणारे माणसे आमदार कोणामुळे झाली? तर बाळासाहेबांमुळे. बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर सांगितले होते, माझे वय झाले. शिवसेनाप्रमुखांची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळतील. त्यांनीच युवा नेतृत्त्व म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले. मग इतरांना आक्षेप कसला?

अजित पवार म्हणाले की, बेडूक फुगतो. मात्र, त्याची मर्यादा असते. बंडखोराचा बोलविता धनी वेगळाच आहे. काहींना वाटते फॉर्म राहिल्यानंतर सोपे जाईल. मात्र तसे होणार नाही. आमदारांचे निधन झाले याचा मुद्दा भावनिक करायची गरज नाही. भाजपने एवढा स्थार्थीपणा केला की, मुक्ताताई टिळक, लक्ष्मण जगताप गंभीर आजारी होते. मात्र, त्यांना अ‍ॅम्ब्युलन्स करून मतदानाला नेले. एक-दोन मते कमी पडली असती, तर काय झाले असते? निवडणुकीपेक्षा तुमचा जीव महत्त्वाचा, आरोग्य महत्त्वाचे हे सांगितले असते, तर काय बिघडले असते, असा सवाल त्यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या