27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रबंडखोर आमदारांसह कुटुंबियांनाही सुरक्षा देणार

बंडखोर आमदारांसह कुटुंबियांनाही सुरक्षा देणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, शिंदे यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी राज्य सरकारने बंडखोर आमदारांसह त्यांच्या कुटुंबियांनादेखील सुरक्षा देण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याचे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

वळसे पाटील म्हणाले की, राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारची कायदा आणि सुव्यस्था बिघडू नये हीच राज्य सरकारची भूमिका आहे. यावेळी त्यांनी सरकार अल्पमतात नसल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान, नवनीत राणा यांनी राज्यातील सर्व परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. या मागणीवर वळसे पाटलांनी भाष्य करणे टाळले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस विभागाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढण्याचे आदेश देण्यात आलेले नसल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, राज्यातील एकूण घडामोडी बघता राज्यातील सर्व आमदारांच्या कुटुंबियांनादेखील सुरक्षा पुरवण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. एकूणच, राज्यात कायदा आणि सुरक्षाव्यवस्था राखण्याचे काम आमचे असून, त्यानुसार राज्यातील सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पोलिस दलालाही अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या