23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रअमरावतीचा पालकमंत्री अन् समाज कल्याण खाते मिळाले तर चांगलेच

अमरावतीचा पालकमंत्री अन् समाज कल्याण खाते मिळाले तर चांगलेच

एकमत ऑनलाईन

मुंबई – मागील १५ दिवसांच्या अनेक धक्कादायक घडामोडींनंतर राज्यात शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सत्तांतर घडवून आणत सरकार स्थापन केले. मात्र शिवसेनेच्या आमदारांसोबत महाविकास आघाडीतील राज्यमंत्री आणि प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू देखील होते. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. मविआमध्ये मंत्रिपद असताना देखील बाहेर पडलेल्या बच्चू कडू यांनी नव्या सरकारमध्ये हव्या असलेल्या मंत्रिपदाबाबत आपली इच्छा व्यक्त केली.

दरम्यान बच्चू कडू यांना कोणते मंत्रिपद हवे याविषयी विचारण्यात आले. त्यावर कडू म्हणाले की, माझा विषय अपंग बांधवांचा आहे. अपंग बांधवांची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी समाजकल्याण खाते दिले तर चांगले होईल. तर अमरावतीमधील कार्यकर्त्यांना आपण पालकमंत्री व्हावे अशी इच्छा आहे. हे मिळाले तर चांगलंच, नाहीतर रामकृष्ण हरी असे कडू यांनी म्हटले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आता मंत्रिपद कोणाला मिळेल, कोणतं खातं मिळेल हा आमचा विषय नाही. आमचा विषय सामान्य माणसाचा, मतदारसंघाच्या विकासाचा आहे. महाराष्ट्रातील अपंग बांधव, शेतकरी यांच्यासाठी काय करता येईल, हेच आमच्या डोक्यात असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.

सरकार लवकर कोसळणार अशी टीका होतेय यावर कडू म्हणाले की, मागच्या सरकारमध्ये देखील देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, सरकार कोसळणार, आता विरोधक म्हणतात सरकार कोसळणार, पण तसे काही होत नसते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या