22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रजे. जे. रुग्णालयामध्ये सापडले १३० वर्षांपूर्वीचे ब्रिटिशकालीन भुयार

जे. जे. रुग्णालयामध्ये सापडले १३० वर्षांपूर्वीचे ब्रिटिशकालीन भुयार

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईमध्ये असलेल्या जे. जे. रुग्णालयामध्ये आज एक भुयार सापडले आहे. १३० वर्षांपूर्वीचे हे भुयार असल्याचे सांगितले जात आहे.

जे. जे. रुग्णालयातील डॉ. अरुण राठोड हे काल रुग्णालय परिसराची पाहणी करीत होते. यावेळी त्यांना एक भुयार आढळून आले. त्यानंतर पुरातत्त्व खात्याला याची माहिती दिली गेली. प्राथमिक माहितीनुसार हे ब्रिटिशकालीन भुयार आहे. साधारण १३० वर्षांपूर्वी ते बांधले गेले, असा अंदाज व्यक्त होत आहे.

जेथे हे भुयार सापडले त्याच्यावर एक वॉर्ड आहे. असे सांगितले जाते की, हा डिलिव्हरी वॉर्ड होता. आपत्कालीन परिस्थितीमध्ये महिलांना बाहेर काढण्यासाठी या भुयाराचा वापर व्हायचा. ‘जे. जे.’च्या डीन पल्लवी पालवे यांनी हा भुयारी मार्ग आणखी मोठा असण्याची शक्यता व्यक्त केली असून पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली तर पुढे खोदकाम सुरू ठेवू, असे त्यांनी सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या