24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रप्रश्नोत्तराच्या तासात जाधव-राणेंचा सामना

प्रश्नोत्तराच्या तासात जाधव-राणेंचा सामना

एकमत ऑनलाईन

मुंबई : मध्ये मध्ये बोलणा-य नितेश राणे यांना काहीतरी शिकवा, अशी विनंती भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. रवींद्र चव्हाण आणि सुनील प्रभू यांच्या प्रश्नोत्तराच्या वेळी हा प्रकार घडला. मी प्रश्न विचारून थकलो आहे. तुमचे अधिकारी मात्र तेच तेच उत्तरे देत आहेत, असा टोला भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला लगावला. २०२३ हा आकडा कायम आहे, परशूराम घाटाचा विषय कायम आहे,

लोकांच्या कोर्ट कचेरीचा प्रश्न आहे. कोर्ट कचेरी पनवेल ते इंदापूर थोडीशी आहे, बाकी कुठे नाही, असे आपले मुद्दे मांडत असताना मध्येच नितेश राणे बोलले. त्यावर मला तुम्हाला विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. मी सरकारला विचारतो, असे भास्कर जाधव म्हणाले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही पाहायला मिळाले.

भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळाला आहे. विधानभवनात प्रश्नोत्तराच्या तासावेळी हा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधव बोलत असताना नितेश राणे यांनी बसूनच काहीतरी बोलण्याचा प्रकार केला. यावर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. मी मंर्त्यांशीच बोलत आहे. अध्यक्ष महोदय, त्यांना काहीतरी शिकवा, अशी भास्कर जाधव यांनी अध्यक्षांना विनंती केली. याआधीही या दोन नेत्यांमध्ये अनेकवेळा वाद झालेला पाहायला मिळाला होता.

फडणवीस-जाधव यांच्यातही टोलेबाजी
माझ्या लक्ष्यवेधीला उत्तर कधी मिळणार, त्यावर मला प्रश्न विचारायचे होते, असे भास्कर जाधव देवेंद्र फडणवीसांना म्हणाले. त्यावर भास्कर जाधव यांना वाचनाची गरजच काय, त्यांना सगळे समजते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आमच्या लक्ष्यवेधीला उत्तर आलेले नाही, आम्ही वाचायचे कधी आणि प्रश्न विचारायचे कधी, असे जाधव म्हणाले होते. पुकारण्याआधी उत्तर देण्याची व्यवस्था आपण करू, असे अध्यक्षांनी म्हणताच, देवेंद्र फडणवीस उठून म्हणाले, की भास्कररावांना वाचायची गरज काय, त्यांना पाहिल्याबरोबर समजते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या