26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयदेशाच्या उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड

देशाच्या उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवाार दि. ६ ऑगस्ट रोजी निवडणूक झाली असता उपराष्ट्रपतीपदी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड निवडून आले आहेत.
एनडीएकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्वा यांच्यात ही लढत होती. यात धनखड यांना ५२८ आणि अल्वा यांना केवळ १८२ मते मिळाल्याने धनखड यांना मोठा विजय मिळाला आहे.

सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपत आहे. त्यामुळे ११ ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती शपथ घेतील. सकाळी १० वाजल्यापासून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली होती. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान केले आहे. यूपीएने उमेदवार ठरवताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. तर उद्धव ठाकरे यांनी मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दर्शवला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या