22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयजहांगीरपूरी हिंसाचार, मुख्य आरोपी अटकेत

जहांगीरपूरी हिंसाचार, मुख्य आरोपी अटकेत

एकमत ऑनलाईन

कोलकाता : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी जहांगीरपुरी हिंसाचाराप्रकरणी फरीद व उर्फ नितू नामक आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याला पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याला लवकरच विमानाने दिल्लीला आणले जाईल.

फरीद जहांगीरपुरी हिंसाचारानंतर फरार झाला होता. त्यानंतर तो सातत्याने आपला ठावठिकाणा बदलत होता. त्याच्याविरोधात २०१० पासून आतापर्यंत दरोडा, सोनसाखळी चोरी व लष्करी कायद्यांतर्गत एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. स्पेशल सेलच्या सूत्रांच्या माहितीनुसार जहांगीरपुरीत दगडफेक झाली, त्यावेळी या आरोपीने जमावाला चिथावणी देत दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दगडफेकीची घटना घडली होती. या आरोपीची दंगलीत अत्यंत सक्रिय भूमिका होती. पोलिसांनी आरोपीला तामलूक गावातील त्याच्या एका नातेवाईकाच्या घरातून अटक करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, गत १६ एप्रिलला दिल्लीच्या जहांगीरपुरीत हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवरून २ समुदायांत हिंसक झडप झाली होती. त्यात ८ पोलिसांसह एक सर्वसामान्य व्यक्ती जखमी झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी ५ आरोपींविरोधात कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या