26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeऔरंगाबादनामांतरावरून जलील यांनी तरुणांची माथी भडकवू नयेत; संभाजी ब्रिगेड आक्रमक

नामांतरावरून जलील यांनी तरुणांची माथी भडकवू नयेत; संभाजी ब्रिगेड आक्रमक

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात एमआयएमने मंगळवारी शहरात भव्य असा मोर्चा काढला होता. त्यानंतर यावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत जलील यांच्यावर निशाणा साधला आहे.

नामांतरावरून जलील यांनी तरुणांची माथी भडकवू नयेत, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली आहे. तसेच इम्तियाज जलील यांना औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन माथा टेकण्यासाठी कसा काय वेळ मिळतो, असेही शिंदे म्हणाले.

एमआयएमच्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना संतोष शिंदे म्हणाले की, इम्तियाज जलील यांना औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन माथा टेकण्यासाठी कसा काय वेळ मिळतो. म्हणजे यांच्या डोक्यात आजही रझाकारांचे विचार भरलेले दिसतात. संभाजी महाराजांचे नाव औरंगाबाद शहराला देण्यात आले आहे, त्यामुळे विनाकारण विरोध करून त्या नावाचा अवमान करू नका. औरंगाबाद जिल्ह्याला संभाजीराजे यांचे नाव देणे अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे पोटशूळ उठायचे काय कारण, असे संतोष शिंदे म्हणाले.

तमाम शिवप्रेमींची इच्छा
जलील यांना आपल्या वडिलांचे नाव बदलल्यासारखे दु:ख होत आहे. औरंगजेबाने आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत युध्द केले आणि त्याने संभाजीराजे यांची हालहाल करून हत्या केल्याचा इतिहास आहे. हाच इतिहास जर पुसण्याचे काम मावळे करत असतील तर यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय आहे. संभाजीनगरला विरोध करू नका हा फक्त आमचा इशारा नाही तर तमाम शिवप्रेमींची इच्छा असल्याचे शिंदे म्हणाले.

शिवसेनेकडूनही टीका…
जलील यांनी नामांतराच्या विरोधात काढलेल्या मोर्चानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हा फक्त मुस्लिम मतदारांना एकजूट ठेवण्यासाठी एमआयएमकडून प्रयत्न करण्यात येत आहे. जशी वाळू पायाखालून सरकते तशी मुस्लिम मते सरकत असल्याने जलील यांच्याकडून अशी आंदोलने केली जात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या