23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रशिवराज्याभिषेक सोहळ््याच्या पूर्वसंध्येला रायगडावर जल्लोष

शिवराज्याभिषेक सोहळ््याच्या पूर्वसंध्येला रायगडावर जल्लोष

एकमत ऑनलाईन

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या पूर्वसंध्येला दुर्गराज रायगडवर लाखो शिवभक्तांच्या वतीने युवराज संभाजी छत्रपती महाराज तथा युवराजकुमार शहाजी छत्रपती यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिवज्याभिषेक सोहळ््याच्या पूर्वसंध्येला दुर्गराज रायगडवर लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. यावेळी संपूर्ण रायगडावर ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक सोहळ््यानिमित्त भक्तांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी येणा-या लोकांची तीन भागांत विभागणी केली. त्यापैकी पहिला मार्ग हा सातारा-कोल्हापूरकडून येणार आहे. सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, नातेखिंडमार्गे स्वत:ची वाहने घेऊन येणा-या शिवप्रेमींसाठी कोंझर-१ आणि कोंझर २ इथे वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली.

सर्व साहित्य घेऊन जाणा-या गाड्यांची श्रीमंत युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने ५ जून आणि ६ जून रोजी अखंडपणे अन्नछत्र सुरु राहणार आहे.

दुर्गराज रायगडवर ६ जून रोजी आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ््याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गडावर अन्नछत्र चालू असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, याच बरोबर निवा-याची व्यवस्था करण्यासाठी समितीचे पदाधिकारी आहोरात्र झटत आहेत. येणा-या शिवभक्तांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी समिती कार्यरत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या