32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeऔरंगाबादजावेच्या डोक्यात कु-हाड घालत घेतला जीव

जावेच्या डोक्यात कु-हाड घालत घेतला जीव

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील माहुली शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून, एका मनोरुग्ण महिलेने आपल्या मोठ्या सख्ख्या जावेच्या डोक्यात कु-हाडीने हल्ला करत तिचा खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

अनिता संतोष लांडे (वय ४७ वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून, मनीषा काकासाहेब लांडे (वय ४४ वर्षे) असे आरोपी महिलेचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील मांजरी येथील लांडे कुटुंब माहुली शिवारात गट क्रमांक १३ मध्ये वास्तव्यास आहे. घरात अनिता संतोष लांडे व मनीषा काकासाहेब लांडे या दोघी सख्ख्या जावा असून यातील मोठी अनिता या अपंग आहेत.

तर लहान मनीषा मनोरुग्ण असल्याने तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान सोमवारी रात्री मनीषाचे स्वत:वरील संतुलन सुटल्याने, हातात धारदार शस्त्र (कु-हाड) घेऊन थोरल्या जाऊ अनिता संतोष लांडे यांच्या डोक्यात मारले. त्यात अनिता यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान याची माहिती गावक-यांनी गंगापूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून जखमी महिलेला शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. तर आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, हळहळ देखील व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या