22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रजयवर्धने, जहीरवर मुंबई इंडियन्समध्ये नवीन जबाबदारी

जयवर्धने, जहीरवर मुंबई इंडियन्समध्ये नवीन जबाबदारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयपीएलच्या अनेक फ्रेंचायजींनी जगभरातील टी-२० लीगमधील संघ खरेदी केले आहेत. याचबरोबर अनेक फ्रेंचायजींनी आयपीएल २०२३ची तयारी देखील सुरू केली आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपला जागतिक विस्तार वाढवल्यानंतर व्यवस्थापनामध्ये मोठे बदल केले आहेत. मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेची ग्लोबल परफॉर्मन्स हेड म्हणून नियुक्ती केली आहे.

तर जहीर खानची ग्लोबल क्रिकेट डेव्हलपमेंट हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांबाबत रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमच्या ग्लोबल कोअर टीममध्ये महेला आणि जहीर भूमिका बजावणार आहेत याचा आनंद आहे. मुंबई इंडियन्स कुटुंबाचा हे दोघेही भाग आहेत. मला विश्वास आहे की, मुंबई इंडियन्सचे ब्रँड ऑफ क्रिकेट जागतिक स्तरावरही पोहोचवतील.

दरम्यान, जयवर्धने आपल्या नव्या भूमिकेविषयी म्हणतो की, मुंबई इंडियन्सच्या ग्लोबल क्रिकेट ऑपरेशनचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. नीता अंबानी आणि आकाश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स जागतिक स्तरावरील सर्वांत मोठी क्रिकेट फ्रेंचायजी झाली आहे. मला मुंबई इंडियन्सची जागतिक स्तरावर झालेली वाढ पाहून आनंद होत आहे. मी नव्या जबाबदारीकडे क्रिकेटचा जागतिक ब्रँड तयार करण्याची एक संधी म्हणून पाहत आहे.

दुसरीकडे क्रिकेट डेव्हलपमेंट ग्लोबल हेड म्हणून नियुक्ती झाल्यावर जहीर खान म्हणाला, ‘नीता अंबानी आणि आकाश यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि नवी जबाबदारी दिली ती मी विनम्रपणे स्वीकारतो. एक खेळाडू आणि प्रशिक्षक टीममधील एक सदस्य म्हणून मुंबई इंडियन्स हे माझे दुसरे घरच राहिले आहे. आता आम्ही नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. जागतिक स्तरावर नवीन क्षमता आणि गुणवत्तेला मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाशी जोडण्यासाठी मी काम करेन.’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या