36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयजेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

एकमत ऑनलाईन

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर तो जाहीर करण्यात आला आला असून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कोअर कार्ड सोबतच आज देशातील त्यांचं रॅंकिंग देखील पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना जेईई अ‍ॅडव्हान्सच्या अधिकृत संकेतस्थळावर credentials टाकून निकाल पाहता येणार आहे. त्यासोबतच रॅंकिंग पाहून पुढील प्रवेशाची प्रक्रिया सुरू करता येणार आहे.पुण्याचा चिराग फलोर हा देशात प्रथम आला आहे. एकूण 43,204 जण पात्र ठरले असून यामध्ये 6,707 मुलींचा समावेश आहे.

यंदा जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 ची परीक्षा कोरोनाच्या सावटाखाली 27 सप्टेंबर 2020 दिवशी 222 शहरांमध्ये यंदा 1001 परीक्षा केंद्रांवर जेईई अ‍ॅडव्हांसची पार पडली आहे. आज या परीक्षेचा अंतिम निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
jeeadv.nic.in ला भेट द्या.
होम पेज वर तुम्हांला JEE Advanced Result 2020 link दिसेल.
वेबपेजवर तुम्हांला विचारण्यात आलेली अत्यावश्यक माहिती भरा आणि सबमीट क्लिक करा.
त्यानंतर तुम्हांला स्क्रिनवर निकाल पाहता येईल.
हा निकाल तुम्ही डाऊनलोड करू शकता. सेव्ह करून ठेवू शकता.

जेईई मेन्स निकाल 2020 च्या नंतर सुमारे अडीच लाख विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र असतात मात्र यंदा जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 साठी केवळ 1 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 मार्कशीट मध्ये विद्यार्थ्याचे मॅथ्स (गणित), फिजिक्स (भौतिकशास्त्र) आणि केमेस्ट्री (रसायनशास्त्र) या तिन्ही विषयातील मार्कांचे अ‍ॅग्रिगेट काढून निकाल बनवला जातो.दरम्यान जेईई अ‍ॅडव्हांस पेपर 1 आणि 2 या दोन्ही परीक्षा देणार्‍यांचेच अ‍ॅग्रिगेट मार्क्स काढून रॅकिंग जाहीर केले जाते.

जीएसटी कौन्सिलची आज बैठक, वादळी ठरण्याची शक्यता

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या