26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रजेजुरीच्या मर्दानी दस-याला सुरुवात

जेजुरीच्या मर्दानी दस-याला सुरुवात

एकमत ऑनलाईन

पुणे : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन वर्षे हा उत्सव झाला नव्हता. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट दूर झाल्याने मोठ्या उत्साहात मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे. ४० किलोची देवाची तलवार आहे.

त्या तलवारीलाच खंडा असे म्हटले जाते. या खंडाच्या विविध कसरती केल्या जातात याला मर्दानी दसरा असे म्हटले जाते. या उत्सवाला आता सुरुवात झाली असून राज्यभरातून हजारो भाविकांनी हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी केली आहे. रात्री देवाची पालखी गडावरून गावामध्ये समोर आली होती.

ही पालखी गडावर सकाळी परत आल्यानंतर मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला भंडा-याची उधळण केली जाते. त्यानंतर पहाटे खेळाला सुरुवात होते. भाविक फेटे बांधून यात सहभाग घेतात. गडावर या दरम्यान उत्साहाचे वातावरण असते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या