26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयजेट एअरवेज पुन्हा सुरू होणार

जेट एअरवेज पुन्हा सुरू होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (एनसीएलटी) जेट एअरवेजसाठी कलरॉक-जालानच्या कंसोर्शियम ठराव योजनेला २२ जून रोजी मान्यता दिली. मात्र या मंजुरीसोबत काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्यासाठी १३७५ कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसंच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्याच्या आत इतर ३० विमान कंपन्यांसोबत जेट एअरवेज पुन्हा काम सुरु करेल असेही सांगण्यात आले आहे.

जेट एअरवेजला स्लॉट उपलब्ध करुन देण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालय आणि नागरी उड्डयन मंत्रालय यांना २२ जूनपासून ९० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. नागरी उड्डयन नियामक कंपनीच्या स्लॉटवर अंतिम निर्णय घेईल. जेट एअरवेजच्या इनसॉल्वेंसी रिझोल्यूशन प्रोफेशनल आशिष छावचारिया यांनी सांगितले की, डीजीसीएच्या निर्णयामुळे खूष आहे. डीजीसीए आता एनसीएलटीच्या निर्णयाला आव्हान देण्याचे कोणतेही कारण नाही.

देशात तिसरी लाट येणार नाही; राकेश झुनझुनवालांचा दावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या