19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeनांदेड बसस्थानकात सव्वा दोन लाखाचे दागिणे चोरले

नांदेड बसस्थानकात सव्वा दोन लाखाचे दागिणे चोरले

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
वजिराबाद येथील बसस्थानकातून एका ६६ वर्षीय महिलेच्या बॅगमधील २ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरीला गेले आहेत. रमादेवी इरेशाम मरगेवार रा.देगलूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १८ जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते १२ वाजे दरम्यान आपल्या खांद्याला पर्स अडकवून त्या बसमध्ये प्रवेश करत होत्या.

याच दरम्यान त्यांच्या पर्समधील तीन तोळे वजनाचा सोन्याचा पोहेहार, सोन्याच्या मनीची माळ असे एकूण २ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेल़े वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार अधिक तपास करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या