23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeजिंतूर आगाराला दोन दिवसांत अडीच लाखाचे उत्पन्न

जिंतूर आगाराला दोन दिवसांत अडीच लाखाचे उत्पन्न

एकमत ऑनलाईन

जिंतूर : अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशानुसार ७ जून पासून जिल्ह्यात बससेवा सुरू झाली आहे. बससेवा सुरू होताच जिंतूर आगराच्या बसने दोन दिवसात साडेअकरा हजार किलोमीटरचा पल्ला पार केला आहे. या दोन दिवसांत जिंतूर आगाराला अडीच लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहीती सहाय्यक वाहतूक निरीक्षक बि.जी.ढाकणे यांनी दिली आहे.

जिंतूर तालुक्यात कोरोना उद्रेक वाढत असल्याने मागील अडीच महिन्यापासून संपूर्ण बससेवा बंद होती. सध्या कोरोना रूग्णाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काही निर्बंध घालून बस प्रवासासाठी परवानगी दिली आहे. बससेवा सुरू होताच पहिल्या दोन दिवसात जिंतूर आगाराच्या गाड्यांच्या औरंगाबाद (०६), परभणी (१२०), रिसोड (०६), औंढा नागनाथ (२०), सेलू (१६), गंगाखेड (१६) फे-या झाल्या आहेत. पहिल्या दिवशी ७ जून रोजी जिंतूर आगराच्या बसने ४७१३ किलोमीटरचा प्रवास केला असून ९० हजाराचे उत्पन्न मिळाले.

८ जूनला ६७३९ किलोमीटरचा प्रवास गाड्यांनी केला असून दीड लाखाच्यावर उत्पन्न मिळाले आहे. दोन दिवसांत मिळून जिंतूर आगाराला अडीच लाखाचे उत्पन्न मिळाले आसल्याची माहिती सहाय्यक वाहतूक निरीक्षक बि.जी.ढाकणे, वाहतूक नियंत्रक के.सी.गीत्ते यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना दिली आहे.

भाजपला वर्षभरात मिळाल्या ७५० कोटींच्या देणग्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या