22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयजोधपूर हिंसाचार, १४१ जण अटेकत

जोधपूर हिंसाचार, १४१ जण अटेकत

एकमत ऑनलाईन

जोधपूर : राजस्थानमधील जोधपूर येथे ईदच्या दिवशी दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर कर्फ्यू लागू करण्यात आला. तसेच शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. याबाबत माहिती देताना पोलिस महासंचालक एमएल लाथेर यांनी सांगितले की, जोधपूरमधील परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

पोलिसांनी आतापर्यंत एकूण १४१ जणांना अटक केली. यापैकी १३३ जणांना कलम १५१ अन्वये अटक करण्यात आली असून ८ जणांना इतर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत ४ एफआयआर आणि नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर ८ एफआयआर नोंदवले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या