24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeउद्योगजगतजॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन पावडरची विक्री होणार बंद

जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन पावडरची विक्री होणार बंद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरातील कोट्यवधी महिलांनी कधी ना कधी त्यांच्या बाळांना जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर लावली असेल. एक काळ होता जेव्हा या कंपनीची उत्पादने लहान मुलांसाठी सुरक्षित मानली जात होती. या कंपनीची उत्पादने भारतातही चांगलीच लोकप्रिय झाली आहेत. पण पुढच्या वर्षात तुम्हाला या कंपनीची टॅल्क बेस्ड बेबी पावडर बाजारात मिळणार नाही. जॉन्सन अँड जॉन्सनने २०२३ मध्ये जगभरात या पावडरची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने गुरुवारी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यामध्ये कंपनी २०२३ मध्ये जागतिक स्तरावर तिच्या वादग्रस्त टॅल्क-बेस्ड बेबी पावडरची विक्री थांबवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये विक्री थांबवल्यानंतर दोन वर्षांनी जागतिक स्तरावर उत्पादनाची विक्री थांबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की ते टॅल्क-बेस्ड पावडरपासून कॉर्नस्टार्च-आधारित बेबी पावडरचा पर्याय स्विकारत आहेत.

या पावडरबाबत हजारो तक्रारी
रिपोर्टनुसार, कंपनीने २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये टॅल्क-बेस्ड बेबी पावडरची विक्री बंद केली आहे. कंपनीच्या विरोधात जवळपास ३८,००० केसेस चालू आहेत, ज्यामध्ये अनेक महिलांचे म्हणणे आहे की ही बेबी पावडर वापरल्यानंतर त्यांना गर्भाशयाच्या कर्करोगाची समस्या झाली. कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कॅन्सर निर्माण करणारे घटक सापडल्याचा दावाही अमेरिकन नियामकांनी केला आहे. मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळून लावले होते. विक्रीत घट झाल्यामुळे उत्तर अमेरिकेतील बाजारपेठेतून ते काढून टाकल्याचे कंपनीने म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या