20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रकल्याणचा पुढचा खासदार मनसेच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही

कल्याणचा पुढचा खासदार मनसेच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : कल्याणचा पुढचा खासदार मनसेच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही, असा सूचक इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला आहे. तसेच त्यांनी घराणेशाहीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. शिंदे गटात घराणेशाही नवीन नसल्याचे राजू पाटील यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीला पायउतार करून सत्तेत आलेल्या भाजपला आणि शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या मनसेने आता शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी मनसे आणि शिंदे गटामध्ये पोस्टर वॉर रंगले होते. रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून मनसेकडून पोस्टर लावत शिंदे गटाच्या कामावर बोट ठेवले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून देखील मनसेच्या पोस्टरला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा मनसे आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे.

मी आमदारकीला उभे राहणार नव्हतो. मात्र, राज ठाकरेंनी म्हटल्यामुळेच मी उभा राहिलो. जर त्यांनी सांगितले खासदारकीला उभा राहा, तर ती निवडणूकही लढवेन. पण एक गोष्ट निश्चित आहे, की यापुढे कल्याणचा खासदार जो कोणी होईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला मनसेची मदत घ्यावीच लागेल. मनसेच्या मदतीशिवाय कल्याणमध्ये कोणीही खासदार होऊ शकणार नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

शिंदे गटात घराणेशाही नवीन नाही. हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहतो आहोत. मात्र, प्रत्येक पक्षाने हे लक्षात ठेवायला हवे, की केवळ घरातले नाही, तर कार्यकर्त्यांनाही संधी द्यायला पाहिजे. दरम्यान, शिवसेना आणि ठाकरे गटातील वादावर ते म्हणाले की, दोन्ही गटांत असंतोष स्पष्ट दिसून येत आहे. हे महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने बरोबर नसल्याचे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या