31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयकमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द!

कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द!

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, कॉंग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रचारादरम्यान, भाजपच्या महिला उमेदवारांचा आयटम असा उल्लेख केला होता. याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन थेट कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जाच आयोगाने काढून घेतला आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आयोगाने ही कारवाई केली. त्यामुळे आयटम प्रकरण भोवल्याचे बोलले जात आहे. मात्र, कॉंग्रेसने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.

यापुढे जर कमलनाथ यांनी एकही प्रचारसभा केली तर त्याचा संपूर्ण खर्च हा त्या मतदारसंघातील उमेदवाराकडून वसूल केला जाईल, असा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी कमलनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त ‘आयटम’ विधानाप्रकरणी नोटीस पाठवली होती आणि ४८ तासांत याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान कमलनाथ यांनी भाजपाचे उमेदवार इमरतीदेवी यांना कथीतरित्या आयटम संबोधले होते. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले की, मी कोणाला असे बोललो नाही. जर यामुळे संबंधित व्यक्ती दुखावली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, माझ तसे म्हणण्याचा हेतू नव्हता.

राहुल गांधी यांनीसुध्दा व्यक्त केली होती नाराजी
राष्ट्रीय महिला आयोगानेदेखील या प्रकरणी कमलनाथ यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

काँग्रेस कोर्टात जाणार
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कठोर कारवाई करत निवडणूक आयोगाने काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे नाव काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय काँग्रेस पक्षाला मान्य नसून आयोगाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष आता कोर्टाचे दार ठोठावणार आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक नरेंद्र सालुजा यांनी ही आयोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याची माहिती दिली.

आधार पडताळणीनंतरच निधी मिळणार – वार्षिक ६००० रुपये किसान सन्मान निधी योजना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या