35.2 C
Latur
Monday, March 8, 2021
Home महाराष्ट्र धर्माच्या पलीकडलं नातं , हिंदू भाच्याचं पठाण मामाकडून कन्यादान

धर्माच्या पलीकडलं नातं , हिंदू भाच्याचं पठाण मामाकडून कन्यादान

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : सध्या सोशल मीडियावर शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पार पडलेल्या एका लग्न समारंभाची प्रचंड चर्चा आहे. भारतात अनेक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असतात याच गोष्टीचा प्रत्यय या लग्न समारंभातून दिसून आला. या लग्नात मुस्लिम समाजातील पठाण मामाने दोन हिंदू भाचींचे कन्यादान केलेआहे त्यामुळे या लग्नाची सध्या चर्चा सुरु आहे.

बोधेगाव येथील सविता भुसारी याना दोन मुली आणि एक मुलगा आहे. पतीने अर्ध्यावरच साथ सोडल्याने त्या माहेरी आल्या तेथेच राहू लागल्या. तिथेच त्यांनी दोन्ही मुलींना लहानाचं मोठं केलं. बोधेगावताच त्यांच्या घराशेजारी बाबा पठाण नावाचे गृहस्थ राहतात. सविता भुसारी यांचे ते मानलेले भाऊ. त्यामुळे सविता यांच्या मुलींच्या लग्नात बाबा पठाण मामा म्हणून उभे राहिले.

सविता भुसारी या दरवर्षी पठाण यांना राखी बांधतात. त्यामुळे मुलींच्या लग्नात त्यांनी मामाची भूमिका खंबीरपणे निभावली. भुसारी कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असल्याने मुलांच्या शिक्षणासाठीही बाबाभाईंनी हातभार लावला. सविता यांची मुलगी गौरी बी.ए. झाली. तर धाकटी सावरी हिची बारावी झाली.

मुंगी येथील दोन सख्या भावाशी त्यांचे लग्न जमले. त्यामुळे बाबाभाई पठाण यांनीच पुढाकार घेत ते दोघे भाऊ आणि या दोघी बहीणी यांचे लग्न लावून दिले. त्यामुळे धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन या लग्नात घडले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या