नवी दिल्ली : होळी साजरी करण्याची क्रेझ तर तशी आता संपली आहे पण याच दरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. पायलटने कॉकपिटमध्ये करंजी खाल्ल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे.
विमानाच्या सुरक्षिततेसाठी पायलटला काही नियमांचे पालन करावे लागते. कॉकपिट म्हणजे विमानाचे केबिन किंवा जागा, जिथून पायलट आणि को-पायलट विमान उडवण्याचे काम करतात. ही केबिन पायलट आणि को-पायलट दोघांसाठी एका ऑफिससारखी काम करते. पायलटला इतर माहितीसुद्धा इथूनच मिळते.
खरंतर, कोणत्याही विमान कंपनीचे धोरण सारखे नसते, पण बरेचसे समान असते. यामध्ये जेवणाबाबतही विशेष नियम आहेत. काही फ्लाईट्समध्ये विमान उडवताना, पायलटला कॉफी पिण्यासही मनाई आहे, तर काही विमान कंपन्यांमध्ये सूट दिली जाते. यासोबतच सर्व एअरलाइन्स पायलटच्या कॉकपिटमध्ये काहीही खाण्यास बंदी घालतात.