25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रकर्नाटक पोलिसांची अडवणूक कायम ; विजय देवणेंना परत महाराष्ट्रात पाठविले

कर्नाटक पोलिसांची अडवणूक कायम ; विजय देवणेंना परत महाराष्ट्रात पाठविले

एकमत ऑनलाईन

कोगनोळी (बेळगाव) : बेळगाव जिह्यात एक नोव्हेंबर हा दिवसा मराठी भाषक काळा दिन म्हणून पाळतात. त्यामुळे तेथील मराठी भाषकांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिह्यातून शिवसैनिक कर्नाटकात निघाले असता पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर त्यांची अडवणूक केली.

कर्नाटक पोलिसांनी कोल्हापूरचे जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांच्यासह शिवसैनिकांना परत महाराष्ट्रात पाठवून दिले.
कोल्हापूरहून बेळगावकडे जाणा-या शिवसेनेच्या मशाल व भगवा झेंडा मोर्चाची दूधगंगा नदीवर पोलिसांनी अडवणूक करीत त्यांना कर्नाटकात प्रवेशावर बंदी घातली.

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे सुमारे दोन तास महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या