26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयकार्ती चिदंबरम यांच्या  निकटवर्तीयाला सीबीआयकडून अटक

कार्ती चिदंबरम यांच्या  निकटवर्तीयाला सीबीआयकडून अटक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बेकायदेशीर व्यवहारांप्रकरणी सीबीआयने माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर मोठी कारवाई केली. काल (मंगळवारी) सीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आता कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयाला सीबीआयने अटक केली आहे. व्हिसा भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयने कार्ती चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमणला रात्री उशिरा चेन्नईत अटक केली. याच प्रकरणात (काल) सीबीआयने कार्ती चिदंबरम यांचे घर आणि कार्यालयावरही छापे टाकले होते. कार्ती चिदंबरम यांच्यावर अनधिकृतरीत्या पैसे घेऊन चिनी नागरिकांना व्हिसा दिल्याचा आरोप असल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वीही लाखो रुपये घेऊन व्हिसा तयार करण्याच्या प्रकरणात सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित मालमत्तांवर कारवाई केली होती. या प्रकरणी सीबीआय कार्ती चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमण यांची चौकशी करत होती. त्यानंतरच सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले आहे. कार्ती चिदंबरम यांनी चिनी कंपन्यांमधील लोकांना आपली खास ओळख वापरून व्हिसा दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे.

सीबीआयच्या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी एक ट्विट करत केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. ते म्हणाले, आतापर्यंत ही छापेमारी किती वेळा झाली, हे मोजायला मी विसरलोय. नक्कीच हा एक विक्रम असेल. दरम्यान आयएनएक्स मीडिया प्रकरणी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्ती यांना अटक करण्यात आली होती. लंडनला गेलेले कार्ती चेन्नई विमानतळावर परत येताच त्यांना अटक करण्यात आली. चेन्नई विमानतळावरच सीबीआयकडून कार्ती यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना दिल्लीला नेले जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या