24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमनोरंजनकार्तिक आर्यनला कोरोनाची लागण

कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘भूलभुलैया २’ या चित्रपटामुळे सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेला अभिनेता कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वृत्त असून अभिनेता कार्तिक आर्यनसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.

कार्तिकला दुस-यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्याने मिश्कीलपणे ही गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. सोशल मीडियावर त्याने मजेदार कॅप्शन दिले आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कार्तिकला पहिल्यांदा कोविड १९ ची लागण झाली होती.

आता कार्तिक दुस-यांदा कोरोनाबाधित झाला आहे. सोशल मीडियावर याची माहिती देताना त्याने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या ‘भूलभुलैया २’ च्या यशाकडे लक्ष वेधत कॅप्शनमध्ये लिहिले- ‘सब कुछ इतना पॉझिटिव्ह चल रहा था, कोविड से रहा नहीं गया’ यासोबत त्याने एक इमोजीही जोडला आहे. त्याची ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याला स्वत:ची काळजी घेण्यास सांगत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या