23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रकरुणा शर्मा यांच्या अडचणीत वाढ; संगमनेर पोालिस ठाण्यात गुन्हा दाखल

करुणा शर्मा यांच्या अडचणीत वाढ; संगमनेर पोालिस ठाण्यात गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

संगमनेर : करुणा शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शर्मा यांच्या विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तक्रारदाराविरोधात करुणा शर्मांच्या वतीनं आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करुणा शर्मा यांच्याविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीसह जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवा पक्ष काढण्यासाठी फिर्यादीकडून लाखो रुपये करुणा शर्मा यांनी घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२२ लाख ४५ हजार रोख आणि १२ लाखांचे सोने घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. उसनवारी म्हणून दिलेली रक्कम आणि सोने परत मागितल्याने जीवे मारण्याची धमकी करुणा शर्मा यांनी दिली असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. संगमनेर तालुक्यातील कोंची येथील फिर्यादी भारत भोसले यांनी हे आरोप केले आहेत. ७ जानेवारी ते २५फेब्रुवारी २०२२ दरम्यान व्यवहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शर्मा यांनीही दाखल केला गुन्हा
करुणा शर्मा यांची यांनीही संगमनेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरमधील तिघांनी त्यांना एका कन्स्ट्रक्शन कंपनीत पैसे गुंतवल्यास तुम्हाला खूप फायदा होईल, असे सांगत त्यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले. याचा कुठलाही परतावा न दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर करुणा शर्मा यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या