23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयकाश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक दोषी

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक दोषी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासीन मलिकविरोधातील आरोप सिद्ध झाले असून मलिकला दोषी ठरवले आहे. काश्मीर खो-यात दहशतवादासाठी निधी पुरवल्या प्रकरणी एनआयएच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. त्याचबरोबर, न्यायालयाने मलिकच्या आर्थिक स्थितीचा लेखा-जोखादेखील सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २५ मे रोजी होणार आहे.
यासीन मलिक सध्या तुरुंगात असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १६ (दहशतवाद कायदा), कलम १७ (दहशतवादासाठी निधी), कलम १८ (दहशतवादाचा कट रचणे) आणि कलम २० (दहशतवादी टोळीचा सदस्य) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. याशिवाय त्याच्यावर त्याच्यावर यूएपीए, १२०ब (गुन्हेगारी कट) आणि देशद्रोहाचाही आरोप आहे. या आरोपांना यासीन मलिकने आव्हान न देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे यासीन मलिकने एकप्रकारे आपल्या गुन्हेगारी कृत्यांची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.
काश्मीरमधील तरुणांना चिथावणी देण्यापासून हवाई दलाच्या अधिका-यांची हत्या, हाफिज सईदसोबतची भेट, तत्कालीन गृहमंत्री मोहम्मद सईद यांच्या मुलीचे अपहरण, असे अनेक आरोप यासीन मलिकवर आहेत.

१० नेतेही निशाण्यावर
१० मे रोजी झालेल्या सुनावणीत फारूख अहमद डार ऊर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसर्रत आलम, मोहम्मद यूसुफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वटाली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल राशिद शेख आणि नवल किशोरी कपूरसह काश्मीरमधील अन्य फुटीरतावादी नेत्यांच्या विरोधात औपचारिकरीत्या आरोप सिद्ध करण्यात आले आहेत. लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सैयद सलाहुद्दीनविरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. यात त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या