23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपदाची मर्यादा राखा, केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का? -पृथ्वीराज चव्हाण

पदाची मर्यादा राखा, केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का? -पृथ्वीराज चव्हाण

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये रंगलेलं ट्विटर युद्ध चांगलंच पेटलं आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही उडी घेतली आहे. ‘रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पदाची मर्यादा तरी राखली पाहिजे, केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का?’ असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्यांना दिला.

एकमेकांना दोष द्यायचा तर केंद्राचेही अनेक दोष आहेत
‘पियुष गोयल यांनी पदाची मर्यादा तरी राखली पाहिजे. ते ट्विटवरुन उत्तर देतात. हे केंद्रीय मंत्र्याला शोभते का? केंद्रीय मंत्र्यांनं कसं वागलं पाहिजे. एकमेकांना दोष द्यायचा तर केंद्राचेही अनेक दोष आहेत,’ असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशी भाषा करु नये. त्यांना रोजगार निर्माण करता आला नाही म्हणून हे लोक महाराष्ट्रात आले. त्यांची राज्यात काळजी घेतली गेली. पण असं आरोप करुन उत्तर मिळणार नाही,’ असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

…उद्या म्हणाल मुंबई-नागपूर महापालिकेने काय पॅकेज जाहीर केल?
‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटवर पुस्तक लिहिलं आहे. त्यांना याबाबत अधिक माहिती आहे की राज्य सरकार कधीही पॅकेज देत नाही. केंद्र सरकार देत असतं. राजकारणासाठी मागणी करत असाल, तर ठीक आहे. उद्या म्हणाल की मुंबई महापालिका आणि नागपूर महापालिकेने काय पॅकेज जाहीर केलं,’ असा टोलाही पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला.

Read More  सुधारणा म्हणजे कामगार कायद्यांचे उच्चाटन नव्हे!

सीतारमन यांनी पाच दिवस प्रदीर्घ प्रेस घेतली; आमची निराशा झाली
‘पंतप्रधान मोदी सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हा एक जुमला आहे. देशात प्रत्येक पंतप्रधान यांनी फार मोठे बदल केले त्यांची एक वेगळी ओळख आहे. मोदींनी आत्मनिर्भरतेचा शोध लावण हे दुर्देव आहे. भारतात आर्थिक मंदीचं जागतिक पातळीवर भाकीत केलं आहे. मोदींनी 20 लाख कोटींची घोषणा केली होती तेव्हा आम्ही त्याचं स्वागत केलं होतं. पण अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पाच दिवस प्रदीर्घ प्रेस घेतली. त्यात आमची निराशा झाली.”त्यात कोणतीही मदत नाही तर फक्त कर्ज आहे. 20 लाख कोटींपैकी फक्त 2 लाख कोटी खर्च होणार आहे. बाकी सर्व कर्ज घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याशिवाय तोट्यात गेलेल्या उद्योगांना बँका कर्ज देणार नाही. ही कर्ज घेतली की ती परत होणार नाही आणि पुन्हा त्याला माफ करावा लागेल. सरकारने थेट अनुदान दिलं पाहिजे. कोरोनाच्या लढाईत सरकार कमी पडलं आहे. खोदा पहाड और अशी अवस्था निर्मला सीतारमन यांची झाली आहे. सरकारला किती ही कर्ज काढावे लागले, नोटा छापाव्या लागल्या तरी अर्थचक्र थांबता कामा नये,’ असाही सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या